ID: com.dg.omj
Version: 1.1
Size: 0 Mb
Online Maratha Jeevansathi Screen Preview
Online Maratha Jeevansathi Details
नमस्कार , आज मराठा समाजातील उपवर वधू-वरांसाठी योग्य सहचारी शोधणे मोठे जिकरीचे काम झाले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आजच्या डिजिटल युगाशी समरस होत आम्ही आपल्यासाठी वधू-वर नोंदणी अॅप सुरु केले आहे. या अॅपचा उपयोग समाजातील सर्व शिक्षीत, उच्चशिक्षीत, प्रोफेशनल व्यक्तींनी नोंदणी करण्यासाठी करावा असे आवाहन करीत आहे. बांधवांनो या मोबाइल अॅपचा मुख्य उद्देश अनुरूप वधु -वर संशोधन हा जरी असला तरी या अॅपद्वारे आम्ही मराठा समाजातील अनेक समस्यांवर क्रांतिकारी सुधारणा करण्याचे योजिले आहे. मराठा समाजातील विवाहावर फार मोठा अनावश्यक खर्च होत आहे हा खर्च प्रबोधनाच्या माध्यमातून कमी करून उरलेली बचत नव वधु-वरांच्या भविष्यासाठी काहीही भरीव करता येऊ शकते, यावर लक्ष केंद्रित करण्याचे योजिले आहे. समाजातील विविध संघटनांनी मंगल कार्यालय निर्मितीवर प्रचंड मोठया प्रमाणावर खर्च करण्यापेक्षा समाजातील गोर-गरीब मुला - मुलींना स्पर्धा परीक्षा व खेळासाठी (sports) लागणाऱ्या पायाभूत सुविधांची निर्मिती, मुला - मुलींसाठी हॉस्टेल, डिजिटल लायब्ररी, इतर सुविधा व निर्मितीवर भर द्यावा असे नम्रतापूर्वक आवाहन करीत आहे. मराठा समाज हा बऱ्यापैकी शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. शेती व्यवसायाच्या अनेक समस्या आहेत, नवनवीन तंत्रज्ञान व व्यवसायिक शेती विकास यावर सुद्धा कार्य करण्याचे आम्ही ह्या अॅप संघटनद्वारे आश्वासन देत आहोत . आपल्या सर्वांचे मार्गदर्शन ह्या कार्यात अपेक्षित आहे. आम्हाला मिळणाऱ्या पेड नोंदीत वधू-वरांच्या फी मधून अनुषंगिक खर्च वजा करता उर्वरित रकमेतून समाजातील दरसाल एकातरी गरीब मुलीचा विवाह लावून देऊन तिचा संसार उभा करण्याचा मानस आहे. आपली साथ मिळाली तर एकापेक्षा जास्त गरीब मुलींचा विवाह पार पाडू असा संकल्प मनात धरला आहे. आई जगदंबा आम्हाला यश देवो !!! जय भवानी !! जय शिवराय !!! Online मराठा जीवनसाथी अॅप Team , C.A. रामकृष्ण डावरे (संकल्पना व मार्गदर्शक) सौ .नीलिमा डावरे (संचालिका) श्री . सुर��श गुंजाळ (संचालक) संपर्क: 8286252423Download Online Maratha Jeevansathi 1.1 APK
Search terms:
Online Maratha Jeevansathi for pc
Online Maratha Jeevansathi mod apk
Online Maratha Jeevansathi full version
Online Maratha Jeevansathi full data